कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ऑरेंज सिटी टाऊनशीप च्या पार्किंग मध्ये काळ्या व पांढऱ्या रंगाचे दोन मर्सिडीज च्या नंबर प्लेट वर एकच नंबर आढळल्याने पोलिसांनी सदर वाहन चालकाकडून केलेल्या चौकशीत आरोपी हा वाहनाच्या एकाच नंबर चे दोन नंबर प्लेट चे दस्तावेज हे खोटे बनवून शासनाची फसवणूक केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आरोपी जावेद नागाणी वय 55 वर्षे रा ऑरेंज सिटी पार्क कामठी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 336(2),336(3),340(2)अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपी हा आपल्या ताब्यातील वाहन पांढऱ्या रंगाची मर्सिडीज बेस ई 250 क्र एम एच 14 डी ए 1938 किमती 10 लक्ष रुपये व दुसरी काळ्या रंगाची मर्सिडीज बेस एस 350 एम एच 14 डी ए 1938 किमती 10 लक्ष रुपये च्या दोन्ही कार एकाच नंबर प्लेट वापरून शासनाची जाणिवपूर्वक दिशाभूल केली त्याप्रकरणी पोलिसांनी कातदेशीर रित्या गुन्हा दाखल केला आहे.








