spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रक्तदान करून स्व.अजितदादा पवार यांची जयंती साजरी

नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव आनंदसिंह यांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त फरस चौक येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात भव्य रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. तसेच रक्तदाब (बीपी) व मधुमेह (शुगर) नियंत्रणात कसा ठेवावा, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली. शिबिरात ३५ जणांनी रक्तदान करून समाजात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत जनजागृतीचा संदेश दिला. यावेळी भव्य अन्नदान कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्व.अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रितेश लककेवार, रुबी बरटी, प्रमोद ससासे, रवी विश्वकर्मा, विजय गौरकर, कमल भट्टड, लोकेश पुरोहित, धर्मेंद्र भटेजा, डेविडभाई, बच्चू तिवारी, पप्पू राऊत, रंजीत मेश्राम, डॉ. रामटेके, डॉ. मेंढे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles