spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बहादुऱ्यात अभिजित वंजारी यांच्या विजयाचा जल्लोष

– काँग्रेस जिंदा थी.. जिंदा है.. जिंदा रहेगी.. कैसे हराया च्या घोषणा

बहादुरा :- नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अभिजित वंजारी यांच्या विजयाचा प्रीतम कापसे सोशल फाऊंडेशन व बहादुरा काँग्रेस च्या वतीने खरबी चौक येथे गुलाल उधळून, ढोल ताशाच्या गजरात व अतिशाबाजी करत जल्लोष करण्यात आला.

सायंकाळी ६ वाजता पूजा प्रीतम कापसे यांच्या नेतृत्वात सर्व बहादुरा काँग्रेस चे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व नागरिक तसेच नगरसेविका मोठ्या संख्येने जमा होऊन जल्लोष साजरा केला या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करीत काँग्रेस जिंदा थी जिंदा है और जिंदा रहेगी… कैसे हराया अशा घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले. खरबी चौक ते बहादुरा फाटा पर्यंत वाहनांनी मिरवणूक काढून बहादुरा फाटा येथे सुद्धा घोषणा अतिशबाजी, गुलाल उधळून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला विशेष राजू रहांगडाले यांच्या कैसे हराया या घोषणेने सर्व वातावरण आनंदमय झाले. याप्रसंगी पूजा कापसे, प्रीतम कापसे बहादुरा नगरपंचायत च्या नगरसेविका किरण मुहुर्ले,अमिषा उके यांनी सर्वांना शुभेच्या देत हा विजय पदवीधरांचा, कार्यकर्त्याचा व लोकशाहीचा आल्याचे वक्तव केले. विजय जल्लोषात पूजा प्रितम कापसे, प्रीतम कापसे, नगरसेविका अमिषा सचिन उके, नगरसेविका किरण अभिषेक माहूरे, आश्मीर खान, जावेद शेख, गोपाल वर्धेवार, शंकर गावंडे, विनोद बाराहाते, राजू रहांगडाले, ज्ञानेश्वर मिरे, श्रद्धा कोरे, रिंकी तिवारी, संगीता नरड, अनुप फुलझले, सुमेध नगराळे, विनय फुलझेले, वर्षा झंझाड, उषा देशमुख, निलेश कळंबे, पिंटू भुसारी, प्रकाश डेरे पाटील, शेखर टाले, कृष्णा जाधव, जावेद भाई, इम्रान भाई, साहिल शेख, आतिष गोंडाने, सागर गुरव, इस्माईल शेख, रहीम खान, अमन ठाकूर, मीना अनिल नाकडे, जमील शेख, पिंटू बागडे, राजू काटोले, शंकर धनविजय, शुभम हुके यांच्यासह बहादुरा परिसरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles