नागपूर :- काल महाराष्ट्रातील विधान परिषदेचा निकाल आला सर्वांचे लक्ष असणारे नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी हे तब्बल ३२०० मतांनी निवडून आले. अटीतटीच्या या सामन्यात निकालाच्या शेवटपर्यंत रंगत होती. राजकीय पंडितांना मात्र हा विजय भाकीत नव्हता कारण भाजपा हा मतदारसंघ आपल्याकडे वळता करेल याची सर्वांनाच हमी होती तशी जोरदार लढत भाजपाने दिली देखील. भाजप उमेदवारांनी तिकीट मिळण्यासाठी देखील देवाला साकळे टाकले जसजसे तिकीट घोषित होण्यासाठी वेळ होत होता तसतसे भाजप उमेदवाराचे ठोके वाढत होते. तिकीट मिळवण्यात यश आले पण भाजपाच्या अंतर्गत कलहाने डोके वर केले. माजी आमदारांनी फॉर्म टाकला व शेवटच्या दिवशी देखील फॉर्म वापस नाही घेतला भाजप शिस्तप्रिय संघटना म्हणून ओळखली जाते. तरी देखील इतका भाजप उमेदवाराचा विरोध का ? यामागील मुख्य कारण त्यांच्या स्वभावात असणारा अहंकार असावा. २०१९ ला भाजपनी तिकीट नाकारल्यानंतर भाजप संघटनेत काही मोजके कोहळे समर्थक सोडले तर कोणाला विशेष दुःख झाले नव्हते. इतकेच काय जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या मंत्रालयात हे लोकप्रतिनिधी जातात त्या अधिकाऱ्यांना देखील कोहळहींची तिकीट कटली म्हणून आनंद होता. ही त्यावेळची चर्चा नाही तर वास्तविकता होती. मास्तरांच्या राजकीय कारकीर्दीत भाजपाने भरभरून दिले. आमदार झाल्यानंतर दुसऱ्यांदा तिकीट नाकारण्याची दुःख त्यांच्या पचनी पडत नव्हत. त्यांनी राजकीय चातुर्य वापरून पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी संघटनेत काम करणे सुरू केले. बावनकुळेंनी त्यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष बनवले इतकेच काय त्यांनी पश्चिम नागपूर मध्ये भाजपाची तिकीट देखील आणली येथे देखील फार कमी मताने पराभव सहन करावा लागला. पण मास्तर महत्त्वाकांक्षी होते पुन्हा त्यांनी स्वतःसाठी जागा शोधणे सुरू केले विधानसभेच्या निवडणुकीनंतर लागलीच त्यांनी विधान परिषदेच्या तिकिटासाठी स्वतःची जागा स्थापित करण्याचा प्रयत्न केला. यात पुन्हा बावनकुळे त्यांच्या पाठीशी उभे राहिले व तिकीट देखील मिळवून दिली. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर बंडखोरांची नाराजी थांबवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. नाराजी जरी संपली तरी मनापासून कोणी जुळलेले दिसले नाही. मी मनापासून याकरता म्हणतो आहे की दुसऱ्या पसंतीचे मत भाजपाने मागीतलीच नाही. त्यांनाही हमी होती संघटनेतून आपण आपला परंपरागत गड पुन्हा: मिळूवून टाकू. इतकेच नाही बावनकुळे यांचा देखील दबक्या आवाजात विरोध होता.जातीच्या समीकरणात बावनकुळे पेक्षा जातीचा माणूस हा कृष्णा भाऊंना आपला समजतो इतकेच काय गोरगरीब जनतेसाठी आमदार कृष्णा खोपडेच पालकमंत्री आहेत. लोकांची आपुलकीने विचारपूस करून संबंधित मंत्रालयात कागदाचा पाठपुरावा करून देतात आता तर NIT मध्ये जनसामान्यांचा प्रश्नांचा न्यायनिवाडा खोपडे हक्काने करून देतात. मग तो कुठल्याही मतदारसंघाचा असो किंबहुना कोणत्याही पक्षाचा असो. युवा वर्गाला प्रवीण दटके आपलेसे वाटतात. या दोन्ही नेत्यांचा वाढता जनाधार बघून भाजप नेेत्या मध्ये देखील चिंता आहे. मग काय या दोन्ही नेत्यानी बावनकुळे ची शक्ती परीक्षा होऊ दिली असेल असे म्हणायला हरकत नाही.दुसरीकडे काँग्रेस उमेदवार मागच्या निवडणुकीपेक्षा आपली शक्ती फार कमी खर्च करताना दिसले .मात्र काँग्रेस संघटनेत मुख्य नेत्यांना अभिजीत कोणाचा हा प्रश्नच सुटत नव्हता. म्हणून खूप सारे दिग्गज नेते रणांगणात चेहरा दाखवण्या सारखे उतरले. मात्र गडचिरोली, चंद्रपुरात विजय वडेट्टीवार यांनी पूर्ण ताकद लावली. प्रचार सभेला काँग्रेस उमेदवार एकटे फिरताना सगळीकडे दिसत होते त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची टीम जरी नसली तरी ते सगळ्यांचा फॉलोअप भेटीगाठी नंतरही घेत होते. भाजपमध्ये पक्ष संघटना काम करताना दिसत होती. काँग्रेसमध्ये पदवीधर,शिक्षक मंच व सामाजिक संघटना कामाला लागल्या होत्या. त्यांना सोबतीला जातीचे समीकरण होतं त्यांनाही हमी होती की जातीचे मत वरचढ राहतील तसेच भाजप उमेदवाराला देखील त्यांच्या संघटनेवर विश्वास होता व सोबतीला जातीचे समीकरण देखील होते. देवाची प्रार्थना दोन्ही उमेदवारांनी केली महत्त्वाकांक्षी मास्तरनी श्रद्धेने हात जोडले वारंवार प्रार्थना केली पण देवाने प्रसाद मात्र काँग्रेस उमेदवाराला दिला. हा निकाल म्हणजे देवाने दिलेल्या प्रसाद आहे या मागच्या कारणांचा विचार करूया .पदवीधरांचा उमेदवार म्हणून सभागृहात काही प्रश्न उचलल्यानंतर दरवर्षी रोजगार मेळावा भरवण्यावर आमदारांनी भर दिला होता. यामुळे पदवीधरांच्या मते दोन्ही उमेदवारांमध्ये भाजप संघटनात्मक वरचढ होती. या दोन्ही उमेदवारांना आव्हान दिले ते वर्धे चे नितेश कराळे मास्तर यांनी मोठ्या राजकीय पक्षाच्या या दोन्ही उमेदवारांना हे १००% माहित होते की कराळे मास्तर दहा हजार देखील मत घेणार नाही. भाजपला मात्र कराळे मास्तरांनी दहा हजार मते घेतली तर त्याचा फायदा भाजप उमेदवारालाच होईल वाटत होते. भाजपचे निवडणूक गणित अतिशय सूक्ष्म नियोजनाचे असते पण या वेळेस मनाने काम करणारे नेते नसल्याने नियोजनात चुकले कराळे मास्तरांचे अधिक घेणारे मत हे दुसऱ्या क्रमांकाचे आपल्याला नुकसान देईल हे ते समजू शकले नाही व अहंकाराने एक लाखाचा पल्ला पहिल्या पसंतीच्या मताने गाठू अशा भ्रमात राहिले. कराळे मास्तरांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती उमेदवारी नाही दिली तरी लढणार हे देखील सांगून आले होते त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने कराळे मास्तरांना इतकं गांभीर्याने घेतलं नाही उमेदवारी वापस घेण्यासाठी व मित्रपक्ष धर्म पाळण्यासाठी जो दबाव आणायला हवा होता तो देखील त्यांनी फार उशिरा आणण्याचा प्रयत्न केला व परिणामस्वरूपी त्यांना पक्षातून बाहेर काढले.याला शरद पवार गटांचा हा डाव आहे असं बिलकुल समजू नका कारण की राष्ट्रवादीने कराळे मास्तरांना गांभीर्याने न घेण्याचे मुख्य कारण म्हणजे जंतर-मंतरवरील आंदोलनात पक्षाला आरसा दाखवण्याचे काम आपल्या बेधडक शैलीतून केले होते जे पक्ष शिस्तीला आवडणारे नव्हते. पण या पलीकडे पदवीधरांना मात्र मास्तरांचा जंतर-मंतर वर धावून जाऊन मदतीचा हात देण्याचा व अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची भूमिका आवडली होती.MPSC/NEET/TET या प्रश्नामध्ये अग्रेसर राहून आपली भूमिका त्यांनी वटवली होती. त्याचाच परिणाम आहे २४००० चा पल्ला सहजपणे कराळे मास्तरांनी गाठला. याचे एक सूक्ष्म गणित आहे २०२० नंतर चा युवा नोंदणीकृत पदवीधर हा एकवटला व त्यांनी आपला आवाज बुलंद करण्याकरता सरकारच्या धोरणाच्या विरोधात एक नेता निवडला कराळे यांनी घेतलेल्या मतांचा फायदा मात्र शेवटी काँग्रेसलाच झाला कारण सरकारविरोधात नेहमी आवाज उचलणारे कराळे मास्तर यांनी घेतलेली मते पहिल्या पसंतीची जरी २४००० होती तरी दुसऱ्या पसंतीचा उमेदवार निवडताना पदवीधरांनी सरकारच्या विरोधातल्याच उमेदवाराची निवड केली होती. याचाच फायदा काँग्रेस उमेदवारांला झाला. देवरुपी पदवीधरांनी मागील वेळेस पेक्षा कमी ताकदीने लढणारा पक्ष संघटना व नेते सोबतीला नसताना सरकार विरोधात आपलं मत वंजारीना दिल. ईश्वराने राजयोग देताना काँग्रेस उमेदवारांची निवड केली. हा विजय काँग्रेस उमेदवाराचा नसून राजकीय, सामाजिक खेळीनंतर देखील ईश्वरी शक्तीचाच आहे.
सरकारला युवा पदवीधरांची नाराजी भोवली आणि काँग्रेसला चालून संधी आली – संदीप वसंतराव देशपांडे









