spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यवतमाळ शाखा सोने तारण कर्ज योजनेचा शुभारंभ

यवतमाळ :- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा यवतमाळ येथे ग्राहकांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सोने तारण कर्ज योजना सुरु करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक जी. भास्कर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की ग्राहकांची त्वरीत कर्जाच्या पर्यायांकडे कल वाढलेला असून कागदपत्रांची प्रक्रिया सोपी असल्याने सोने कर्ज हे शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांसाठी एक लोकप्रियता वाढत आहे.

क्षेत्रीय प्रबंधक सुनिल पांडे यांनी ग्राहकांना या योजनेची सविस्तर माहिती दिली. शेती, व्यवसाय, शिक्षण किंवा घरगुती गरजांसाठी या कर्जाचा उपयोग करता येत असल्याचे त्यांनी सांगितले. इतर बँकांच्या तुलनेत कमी व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि कर्जासाठी सिबिल स्कोअरची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या शुभप्रसंगी मुख्य प्रबंधक राजकुमार तरटे, दिपक दाभोळे, जिल्हा अग्रणी प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे, शाखा प्रबंधक जयंत धकिते तसेच अधिकारी, कर्मचारी व बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles