– हिवाळी अधिवेशनातील मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा उद्देश
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ महाराष्ट प्रदेश सघटनेतर्फे येत्या ८ डिसेंबर पासुन हिवाळी अधिवेशन २०२५ दरम्यान विदर्भातील जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षक प्रलंबित समस्यांच्या अणुषंगाने हिवाळी अधिवेशन नागपुर येथे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सुरक्षा रक्षकांच्या संघटनेत रामटेकसह अनेक ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून न्यायासाठी अंत्र्या मंत्र्यांसह अनेक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवुनही न्याय न मिळाल्याने टोकाची भुमीका घेत संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशन दरम्यान साखळी उपोषणाचे पाऊल उचलण्यात आल्याचे यावेळी सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने माहिती देतांना सांगण्यात आले आहे. येत्या ८ डिसेंबर पासुन नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत असलेल्या नागपुर हिवाळी अधिवेश २०२५ वर सघटनेने विदर्भातील जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित विषयांना घेऊन संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश (मुन्ना) यादव, संघटन प्रभारी गजानन गटलेवार, मार्गदशक शंकरराव पहाड़े, महामंत्री रवि कुलरकर याच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये नागपुर सह गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपुर जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक, पदाधिकारी, सभासद उपस्तित राहाणार असुन शासनाच्या विरोधात घोषणा देणार असल्याचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
अधिकाऱ्यांचा हेकेखोरपणा
उल्लेखनिय म्हणजे सन २०२२ पासुन सघटनेमार्फत शासन स्तरावर अनेक बैठकी झाल्या परंतु विषय काही मार्गी लागले नाही, स्थानिक मंत्री महोदयांनी सुद्धा प्रलंबित असलेल्या विषयावर सकारात्मकता दाखवली असली तरी मात्र कामगार विभागातील वरिष्ठ अधिकारी अंमलबजावणी करित नसल्याने संघटनेचा मोठा हिरमोड झालेला आहे. याच निराशेपोटी संघटनेच्या वतीने नागपुर येथे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर सोमवार दिनांक ८ डिसेंबरच्या सकाळी ९ वाजता पासुन साखळी उपोषण करण्यात येणार आहे.




