spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत मोकाट जनावरे व मोकाट श्वान पकडण्याची धडक मोहीम सुरू

चंद्रपूर :- शहरातील नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थेची सुरळीतता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत मोकाट जनावरे व मोकाट श्वान पकडण्याची विशेष धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाच्या पथकांकडून शहरातील विविध भागांत दररोज मोकाट जनावरे व मोकाट श्वान पकडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात, वाहतूक कोंडी तसेच नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

महानगरपालिका नागरिकांना आवाहन करते की, पाळीव जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध लागू नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. तसेच शहरात मोकाट जनावरे किंवा मोकाट श्वान आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेला द्यावी, जेणेकरून संबंधित पथक तात्काळ आवश्यक कार्यवाही करू शकेल.

चंद्रपूर शहर स्वच्छ, सुरक्षित व अपघातमुक्त ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी महानगरपालिकेच्या या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.