spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

८ वर्षांच्या मुलीच्या गळ्यात अडकला च्युइंगम, श्वास कोंडला, तरुणांनी ५ मिनिटांत कसा वाचवला जीव

आपल्यापैकी अनेकांना च्युइंगम चघळायला आवडतं. साधारणपणे च्युइंगम चघळताना एक प्रकारची गंमत वाटते आणि तणावापासून मुक्ती मिळते. पण च्युइंगम चुकूनही कधी गिळू नये, कारण तो घशात चिकटून राहण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार एका लहान मुलीसोबत घडला. ही मुलगी च्युइंगम चघळत सायकल चालवत होती. पण अचानक तिनं च्युइंगम गिळला आणि तिचा श्वास कोंडू लागला. सुदैवानं आसपास उभ्या असलेल्या तरुणांनी तिची मदत केली आणि तिच्या घशात अडकलेला च्युइंगम बाहेर काढला. हा व्हिडीओ पाहून संपूर्ण सोशल मीडिया या तरुणांचं कौतुक करत आहे.

हा व्हिडीओ @Gabbar0099 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही घटना केरळमधील एका गावात घडली आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की एक आठ वर्षांची मुलगी सायकल चालवत च्युइंगम चघळत होती. पण रस्ता ओलांडताना चुकून तिनं च्युइंगम गिळला. सुदैवानं रस्त्याच्या कडेला काही तरुण गप्पा मारत उभे होते. त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. मुलीच्या पाठीवर धपाटे घालून तिच्या गळ्यात अडकलेला च्युइंगम बाहेर काढला. ही घटना रस्त्यावरच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

source : Maharashtra times


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.