spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्हा परिषद तोंडलीत शिक्षणाला मिळणार संगीताची जोड

किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना शारीरिक, बौद्धिक,मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी तोंडली शाळेतील शिक्षक,पालक तसेच शाळा व्यवस्थापन समिती नेहमीच प्रयत्न करत असते. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात नवनवीन विषयांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. असाच एक प्रयत्न शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर तिजारे, उपसरपंच रामपाल धांडे, सदस्य सुरेंद्र बाभरे यांनी करून श्री श्री फाउंडेशन नागपूर अध्यक्ष संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून शाळेसाठी वाद्य साहित्य प्राप्त करून घेतले. त्यामध्ये 1 हार्मोनियम ,1 ढोलक, 4 टाळ ,1 डफ ,1 चंग प्राप्त झाले आहे. संगीताचे साहित्य प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संगीताची जोड मिळणार असल्याने शिक्षण हे आनंददायी होणार आहे.

यासाठी विशेष प्रयत्न राजेश सपाटे, भाऊराव तिजारे,शेषराव धोत्रे, दिगंबर मते,शामलाल धांडे, राजेंद्र अतकरी या प्रतिष्ठित नागरिकांनी विशेष प्रयत्न केले व शाळेसाठी हे वाद्य साहित्य प्राप्त करून दिले. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे इतर विषयांसोबतच कलाविषय अंतर्गत येणारा संगीत विषय विद्यार्थी आवडीने शिकतील. शिक्षणाला संगीताची जोड लागल्याने ते अधिक आनंददायी होईल.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल.असे मत जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे व सहशिक्षक निलेश जाधव यांनी व्यक्त केले व शाळेला वाद्य साहित्य प्राप्त करून देणाऱ्यांचे आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.