नागपूर :- आपला माणूस फाउंडेशन नागपूर तर्फे यावर्षी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव आयोजित सोहळा 2026 मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. या नव्या उपक्रमाबाबत तसेच फाउंडेशनच्या विविध सामाजिक कार्याची माहिती देखील आपला माणूस फाउंडेशनच्या माध्यमातून दिली व मागील काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविल्या गेले आहे. प्रभाग क्रमांक 34 मधील नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार, चित्रकला स्पर्धा, टेनिस बॉल, क्रिकेट स्पर्धा, जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रम साई पालखी सोहळा, रक्तदान शिबिर, तसेच आरोग्य समस्यांनी ग्रस्त रुग्णांना भेट देऊन मदत करणे अशा प्रकारे आपला माणूस फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम करीत आहे. येणाऱ्या 5 एप्रिल रोजी, सुभेदार ले आउट मधील गजानन हायस्कूल जवळ, छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती गगन रहांगडाले यांनी दिली. त्यामध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दक्षिणचे आमदार मोहन मते, आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर, सुप्रसिद्ध शिव व्याख्याते सुदर्शन दादा शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संदीप जोशी, नवनीत राणा, आमदार विजय रहांगदळे, आमदार रवी राणा, राजे मुधोजी भोसले नागपूरचे महापौर व उपमहापौर व प्रभाग क्रमांक 29, 32 व 34 चे सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित राहतील. यावेळी गगन रहांगडाले, ओम प्रकाश झाडे, धनंजय जोशी, विजय रामगीरकर, कमलाकर कुमरे, अविनाश पांढूरकर, आशिष आमलीकवार आणि भूषण बोरकर हे परिश्रम घेत आहेत.
आपला माणूस फाउंडेशन च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन 5 एप्रिल रोजी









