spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मानेवाडा येथील सेवादल नगरात कुँवारा भिमालपेन जन्मोत्सव २ एप्रीलपासून

नागपूर :- कुँवारा भिवसन खोरी पेनठाणा, सेवादल नगर महिला मंडळाच्या वतीने आयोजीत कुँवारा भिमालपेन जन्मोत्सव बुधवार दिनांक २ एप्रील पासून सुरू होत आहे. सायंकाळी कलश स्थापना करण्यात येईल. पालखी यात्रा कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी ३ एप्रील ला सकाळी १० वाजता तसेच गोगो पूजा, सप्तरंगी ध्वजारोहण व भव्य महाप्रसादाचे आयोजन केलेले आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी कुँवारा भिमालपेन पेनठाणा सेवादल नगर, मानेवाडा नागपूर येथे उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सेवादल नगरातील महिला मंडळानी केले आहे.

Popular Articles