spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सूर्यनगरमधील विनापरवानगी झाडांच्या छाटणी प्रकरणी ठेकेदाराला नोटीस बजविण्याचे महापौरांचे निर्देश

नागपूर :- महापौर निता ठाकरे यांनी मंगळवारी (ता.31) प्रभाग 24 मधील सूर्यनगर परिसराला भेट दिली. परिसरात झाडांची छटाई करण्यात आल्याने याबाबत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रसंगी कर आकारणी व कर संकलन विशेष समितीच्या सभापती सरिता ईश्वर कावरे, नगरसेवक प्रदीप पोहाणे नगरसेविका दुगेश्र्वरी कोसेकर, वृक्षसंवर्धन अमोल चौरपगार, सूर्यनगर वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष  हजारीलाल अग्रवाल, सचिव दादाराव येरपुडे, कोषाध्यक्ष श्याम अग्रवाल यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

सूर्यनगर येथे झाडांच्या छटाईच्या नावावर झाडाची कापणी केली करण्यात आल्याने उन्हाळ्यात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत सूर्यनगर वेलफेअर सोसायटीच्या पदाधिकारी यांनी महापौर आणि मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल महापौर यांनी घेत सूर्यनगर येथे भेट दिली.

यावेळी महापौर निता ठाकरे यांनी विनापरवानगी झाडे छाटणाऱ्या ठेकेदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आणि कापलेले लाकूड ज्या वाहनातून नेले, त्याबाबत कळमना पोलीस ठाण्यातून माहिती घेऊन पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच कापणी केलेल्याकडून झाडांच्या वयानुसार नवीन वृक्षारोपण करण्याच्या सूचना त्यांनी उद्यान विभागाला केल्या.

यावेळी महापौर निता ठाकरे यांनी महिला उद्यानात ‘स्मार्ट टॉयलेट’ बसविण्याचे निर्देश दिले. तसेच लता मंगेशकर उद्यानातील बेकायदेशीर वृक्षतोडीबद्दलही कडक कारवाई व दंड आकारण्याचे निर्देश ही महापौर यांनी दिले.

Popular Articles