spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामाचा आढावा

नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे -चवरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना १५ जानेवारी रोजीची निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पाडण्याकरिता सर्व प्रकारचे प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. डॉ खोडे-चवरे यांनी सोमवारी (ता १२) सायंकाळी सर्व निवडणूक अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकारी यांची बैठक मनपा मुख्यालयात घेतली.

याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि  वैष्णवी बी. निवडणूक निरीक्षक म्हणून संतोष थिटे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव उपस्थित होते.

प्रारंभी मनपा आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. खोडे- चवरे व संतोष थिटे यांचे स्वागत केले. आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, नागपूर शहरातील १० झोन मध्ये ३८ प्रभागासाठी निवडणूक होणार असून याकरीत ३००४ मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्रात सर्व आवश्यक सुविधा निश्चित करून देण्यात आली असून, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअरची सुद्धा व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.आयुक्तांनी संवेदनशील मताधिकार अँप, मनपातर्फे मतदारांसाठी तयार करण्यात आलेले आपले मतदान केंद्र अँप, मतमोजणी साठी व्यवस्थाबद्दल संपूर्ण माहिती दिली. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी नागपूर पोलीसांतर्फे करण्यात आलेले पोलीस बंदोबस्त बद्दलची व विविध कारवायांच्या बाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच होम गार्ड सुद्धा नेमण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने १४, १५ आणि १६ जानेवारी रोजी मद्य विक्री बंद ठेवली आहे.

मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर निगराणी ठेवण्यासाठी शहरात ६० भरारी पथके आणि विविध ठिकाणी स्थिर निगराणी ठेवणारी पथकांना अलर्ट राहण्याचे ही निर्देश दिले. तसेच मतदानाच्या दिवशी मॉक पोल गांभीर्याने करणेबाबत व आवश्यक नोंदी ठेवण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

मतदान केंद्रांवर मोबाईल वापरू नये

बैठकीत मतदारांनी मतदान केंद्रांवर जाताना शक्य असल्यास मोबाईलचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले.

Popular Articles