spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांचा सत्कार

– कार्यक्रमासंदर्भात महापौर निता ठाकरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

नागपूर :- नागपूर शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये योगदान देणा-या माजी महापौर, माजी उपमहापौर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मनपाच्या स्थापना दिनी येत्या २ मार्च रोजी मनपा मुख्यालयात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दोन वेळा महापौर पद भूषविले असून,समारंभात त्यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच सर्व आमदार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात महत्वाच्या सूचना महापौर निता ठाकरे यांनी गुरूवारी(ता.२६) झालेल्या बैठकीत दिल्या.

नागपूर महानगरपालिकेच्या स्थापना दिवसाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने गुरुवारी(ता.२६) बैठक पार पडली. बैठकीत उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, नगरसेवक विजय (पिंटू)झलके सुनील हिरणवार, संजय बालपांडे, दिलीप दिवे, दीपक वाडीभस्मे, विनोद कन्हेरे, रामभाऊ आंबुलकर, नगरसेविका  दिव्या धुरडे, मंगला खेकरे, भरती बुंदे, सुषमा चौधरी, यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.

“पौर जन हिताय” या ब्रीद वाक्याला निरंतर जपणारी नागपूर महानगरपालिका नागरिकांच्या अविरत सेवेत तत्पर आहे. भारताच्या मध्यभागी वसलेल्या नागपूर शहराची पालकसंस्था नागपूर महानगरपालिकेला २ मार्च २०२६ रोजी ७५ पूर्ण वर्षे होत आहेत. गत ७५ वर्षात शहराच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या माजी महापौर, उपमहापौर यांचा सन्मान करण्यात यावा, हयातीत नसलेल्या पदाधिकारी यांच्या कुटुंबाच्या सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याकरिता नगरसेवक आणि संबधित झोनचे सहायक आयुक्त यांनी माजी महापौर, उपमहापौर यांना सविनय आमंत्रित करावे,तसेच त्यांच्या ये-जा करण्याची व्यवस्था करावी अशा सूचना सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर यांनी दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.