spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान-तारसा रोड रेल्वे उडाण पुलावरील बंद लाईट त्वरित सुरू करण्याची नागरिकांची मागणी

कन्हान :- कन्हान-तारसा रोडवरील गहु हिवरा चौक ते एम. जी. नगर दरम्यान असलेल्या रेल्वे उडाण पुल संपुर्ण मार्गावरील स्ट्रीट लाईट अनेक दिवसांपासुन बंद असल्याने नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तात डीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संदीप शेंडे, नयन खोब्रागडे आणि नितीन इखार यांनी नगरपरिषद कन्हान-पिपरी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितले की, रात्री च्या वेळी या मार्गावर पूर्णतः अंधार पसरत असल्यामुळे वाहनचालक, पादचारी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असुन सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षितते च्या दृष्टीने गहुहिवरा चौक ते एम. जी. नगर पर्यंत च्या रेल्वे उडाण पुल मार्गावरील सर्व बंद स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करण्यात याव्येत. यासाठी रेल्वे विभागा शी समन्वय आवश्यक असल्यास तोही प्राधान्याने करून समस्या निकाली काढावी, अशी मागणी निवेद नातुन करण्यात आली आहे.

Popular Articles