Home Latest News पी एफ प्रश्नावर सिटू तर्फे जी. प. उप कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन 

पी एफ प्रश्नावर सिटू तर्फे जी. प. उप कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन 

0
3

नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (CITU) भंडारा जिल्हा तर्फे कॉम्रेड राजेंद्र साठे यांचे नेतृत्वात आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना पी एफ लागू करून जिल्हा परिषदेने मानधनातून कपात करून शासकीय रकमेच्या भरणा करावा यावर भंडारा जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी उमेश नंद यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनासोबत सीआयटीयू संलग्न असलेल्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या नावाच्या लिस्ट सह त्यांचे आधार नंबर व नेमणूक दिनांक ची प्रत सादर करण्यात आली सोबत पुणे आयुक्तांची आदेशाची प्रत सुद्धा जोडण्यात आली. संलग्न असलेल्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना पीएफ लागू करण्याबाबत उपकार्यकारी अधिकारी यांना विनंती करण्यात आली.

शिष्टमंडळात कॉ.राजेंद्र साठे, काँ. प्रमोद कावळे, उषा मेश्राम, सुनंदा बसेशंकर, सुजाता साखरे, वैशाली तांडेकर, कुमुद लिमजे, मंगला गौरी, कविता कुपाले अर्धवेळ स्त्री परिचरच्या राज्य कोषाध्यक्ष सविता हटवार उपस्थित होते. आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (CITU) भंडारा जिल्हा तर्फे जिल्हाध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे व जिल्हा उपाध्यक्ष कॉ. प्रमोद कावळे यांनी भंडारा जिल्हा मधील शहापूर भेट देऊन पीएफची प्रक्रिया कशी राबवायची यावर सविस्तर माहिती देऊन आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला. १ ते ३ जूनपर्यंत आजाद मैदान मुंबई येथे होणाऱ्या कामगारांच्या आक्रोश आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याची अपील करण्यात आली.