spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या शॉर्ट फिल्म निर्मिती ‘ई-टेंडर’ वर स्पष्टीकरण

नागपूर :-  लोकमत टाईम्सच्या ‘नागपूर फर्स्ट’ आवृतीत दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीबद्दल हे स्पष्टीकरण आहे. आम्ही आपल्या कामासाठी एजन्सी नियुक्त करण्याची ही पहिली वेळ नाही, तर तिसरी वेळ आहे, मनपा आपल्या जनसंवाद धोरणाचा भाग म्हणून सातत्याने सार्वजनिक जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करत असते. एजन्सीची नियुक्ती करणे हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. यापूर्वी, मनपाच्या जनसंपर्क विभागाने २०२३ मध्ये दोन एजन्सी आणि २०२० मध्ये एका एजन्सीची नियुक्ती अशाच कामांसाठी केली होती. सध्याचे ई-टेंडर दोन वर्षांसाठी पॅनेल स्थापित करण्यासाठी आहे, ज्यासाठी अंदाजित एकूण खर्च रुपये १५ लाख आहे. या शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी केवळ मनपाची कामगिरी दाखवण्यासाठी नसून, नागरिकांमध्ये महत्त्वाच्या नागरी समस्या, विकास प्रकल्प आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहेत.

Popular Articles