spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राज्यभर 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान “अभिजात मराठी भाषा सप्ताह”

– 6 ऑक्टोबरला नागपूरात “माझ्या मराठीचा टिळा” कार्यक्रम

नागपूर :- केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केल्याच्या औचित्याने मराठी भाषा विभागाच्या वतीने 3 ते 9 ऑक्टोंबर 2025 दरम्यान राज्यभर ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत नागपूर येथील वनामती सभागृहात 6 ऑक्टोंबर रोजी ‘माझ्या मराठीचा टिळा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

केंद्र शासनाने 4 ऑक्टोबर 2024 च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने 14 ऑक्टोंबर 2024 रोजी शासन निर्णयाद्वारे 3 ऑक्टोबर हा “अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस” व 3 ते 9 ऑक्टोबर हा “अभिजात मराठी भाषा सप्ताह” म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. यानुसार मराठी भाषा विभागाच्या वतीने 3 ते 9 ऑक्टोंबर 2025 दरम्यान राज्यभर ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे.

यादरम्यान मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर येथील वनामती सभागृहात 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते 8 वाजेदरम्यान ‘माझ्या मराठीचा टिळा’ हा निवडक कवितांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जास्तीत -जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन, मराठी भाषा विभागाच्या अवर सचिव शिल्पा देशमुख यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.