spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रात्रगस्त दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन; गुन्हेगार तपासले, वाहनांची नाकाबंदी करून तपासणी.

 

उमरेड 1 : दिनांक २९ जून २०२५ रोजी वृष्टी जैन, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पेठ, उमरेड येथे रात्री ११:०० वाजेपासून दिनांक ३० जून २०२५ रोजी सकाळी ५:०० वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या गस्तीत उपविभागीय कार्यालय उमरेड येथील पोलीस अंमलदार तसेच दंगा नियंत्रण पथकातील कर्मचारी सहभागी होते. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान मंगळवारी पेठ परिसरात पायदळ पेट्रोलिंग करण्यात आले. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार, तुरुंगातून मुक्त झालेल्या व्यक्ती, अवैध दारू विक्रेते इत्यादींची तपासणी करण्यात आली. त्यांचे घर पंचासमक्ष झडती घेऊन तपासण्यात आले. याशिवाय बायपास चौक, उमरेड येथे नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. संपूर्ण कारवाईत सुरक्षा व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.