spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विकास कामे त्वरित पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

– आयुक्तांनी केली प्रभाग 10 व 11 मधील विकास कामांची पाहणी

नागपूर :- शहरातील प्रभाग १० आणि ११ मध्ये नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विकास कामांची तसेच त्या भागातील समस्यांची पाहणी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मंगळवारी केली. या भागातील प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी नगरसेवक शैलेश पांडे, नगरसेविका स्नेहल ठाकरे, नगरसेवक प्रमोद सिंह ठाकूर, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता सुनील उईके, झोनल स्वच्छता अधिकारी प्रमोद आत्राम यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी बोरगाव रोडवरील दिनशॉ फॅक्टरी येथील गडर लाईनची कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. याशिवाय त्यांनी पिवळी नदीला लागून असलेल्या वस्तीमधून येणारी गडर लाईन मनपाच्या पंप हाऊसच्या पुढे स्थानांतरीत करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यानुसार ही गडर लाईन स्थानांतरीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गोरेवाडा येथील वन जमिनीवरील सामान भांडेवाडी परिसरात हलविण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Popular Articles