spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आयुक्तांनी केली डीपी रोडच्या कामाची पाहणी

नागपूर :- वेटेरीनरी कॉलेज गेट, सेमिनरी हिल्स परिसर येथील डीपी रोडच्या कामाची मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी पाहणी केली. यावेळी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे, विजय गुरूबक्षांनी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. आयुक्त डॉ. विपीन यांनी डीपी रोड अंतर्गत येणाऱ्या विविध कामाची पाहणी केली. तसेच रोडच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासह रोडसाठी प्राप्त निधीचे सुनियोजित नियोजन करण्याचे ही निर्देश दिले. यावेळी सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम यांनी यापूर्वी यापरिसरात अंशतः अतिक्रमण निर्मुलन कारवाई करण्यात आल्याची माहिती आयुक्तांना दिली.

Popular Articles