spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आयुक्तांनी केली एलएडी चौक ते अभ्यंकर नगर चौक दरम्यानच्या रस्त्याची पाहणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे एलएडी चौक ते श्रद्धानंद पेठ चौक दरम्यानच्या मार्गाचा विविधांगी विकास केला जाणार आहे. याच प्रस्तावित विकास कार्याची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता.२७) पाहणी केली.

पाहणी दरम्यान मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, धरमपेठ झोनचे कार्यकारी अभियंता मनोज गद्रे. वास्तुविशारद प्रसन्ना देसाई, कंत्राटदार अभी इंजीनियरिंगचे नुरुल हक, पीएमसी क्रिएशन चे अनिल भारती, खान यांच्या सह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सर्वप्रथम आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी एलएडी चौकापासून पाहणीची सुरुवात केली. एलएडी चौक ते अभ्यंकर नगर चौक दरम्यानच्या मार्गावरील दोन्ही बाजूला सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यात पादचाऱ्यांसाठी प्रशस्त पादचारी मार्ग, सायकल लेन, पार्किंग व्यवस्था आदी कार्य या विकास कार्यात प्रस्तावित आहेत. या मार्ग दरम्यान नाग नदीवरून जाणाऱ्या पुलाच्या सुरक्षा भिंतीचे कार्य करावे आदी सूचना आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.