Home Latest News आयुक्तांची विविध प्रभागात प्रत्यक्ष भेट; नागरी सुविधांची पाहणी

आयुक्तांची विविध प्रभागात प्रत्यक्ष भेट; नागरी सुविधांची पाहणी

0

<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> शहरातील नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांनी विविध प्रभागांना सकाळी लवकर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली&period; दिनांक १० मार्च रोजी एकोरी प्रभागात तसेच ११ मार्च रोजी हिंदुस्थान लालपेठ प्रभागात सकाळी ७&period;०० वाजता भेट देत परिसरातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p><img class&equals;"alignnone wp-image-36886 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;03&sol;commvisit2&lowbar;copy&lowbar;800x458&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"458" &sol;><&sol;p>&NewLine;<p>या भेटीदरम्यान संबंधित प्रभागातील नगरसेवक&comma; सहाय्यक आयुक्त तसेच बांधकाम&comma; पाणीपुरवठा&comma; अतिक्रमण&comma; स्वच्छता आणि विद्युत विभागातील अधिकारी उपस्थित होते&period; आयुक्तांनी परिसरातील रस्ते&comma; स्वच्छता व्यवस्था&comma; पाणीपुरवठा&comma; अतिक्रमणाची स्थिती तसेच इतर मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत स्थानिक प्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले&period; शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी अशा प्रकारे प्रभागस्तरावर नियमित पाहणी करण्यात येणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version