spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

काँग्रेसची आघाडी नोंदणी!

– नागपूर महाविकास आघाडीची सर्वात आधी नोंदणी; संजय महाकाळकर गटनेतेपदी एकमताने निवड

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेत नेतृत्व, शिस्त आणि एकजूट यांचे ठोस उदाहरण देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ‘नागपूर महाविकास आघाडी’ची नोंदणी सर्वात आधी विभागीय आयुक्त कार्यालयात यशस्वीरीत्या करून राजकीय आघाडी घेतली आहे. काँग्रेस हा नोंदणी करणारा पहिला प्रमुख राजकीय पक्ष ठरला असून, यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणि स्पष्ट दिशा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

या ऐतिहासिक क्षणी काँग्रेसचे सर्व ३४ नगरसेवक एकसंधपणे उपस्थित होते. पक्षातील एकजूट, शिस्त व नेतृत्वावर असलेला विश्वास याचे हे ठळक द्योतक आहे. यावेळी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, विधानपरिषदेचे आमदार अभिजीत वंजारी, गिरीश पांडव, कुणाल राऊत, केतन ठाकरे, अतुल कोटेचा तसेच काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

सर्व ३४ नगरसेवकांनी चार वेळा नगरसेवक राहिलेले, अनुभवी नेतृत्व असलेले संजय मधुकर महाकाळकर यांची एकमताने ‘गटनेते’ म्हणून निवड केली. नागपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांचा नेता म्हणून संजय महाकाळकर यांच्या निवडीसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत, प्रभाग क्रमांक–१४ येथील नगरसेवक  अभिजीत झा यांनी सूचक म्हणून प्रस्ताव मांडला, तर प्रभाग क्रमांक–१० येथील नगरसेवक प्रमोद सिंह ठाकूर यांनी अनुमोदक म्हणून त्यास अनुमोदन दिले.

विशेष म्हणजे नगरसेवकांचा हा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तत्काळ अधिकृतपणे मान्य केला असून, काँग्रेसमध्ये निर्णयक्षम व लोकशाही पद्धतीने नेतृत्व घडते, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. निवडणूक काळात आणि निवडणुकीनंतरही काँग्रेसमधील नेते, कार्यकर्ते व नगरसेवक पूर्णपणे एकत्र असून, ही एकजूट सध्या नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. नागपूरकरांकडून या ठाम भूमिकेचे खुलेपणाने कौतुक होत असून, काँग्रेस हा सक्षम, पर्यायी आणि स्थिर पर्याय म्हणून पुढे येत आहे.

या गटाचे नाव ‘नागपूर महाविकास आघाडी’ असे ठेवण्यात आले आहे. इतर धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांतील नगरसेवक काँग्रेससोबत येण्यास इच्छुक असल्याने, ही आघाडी आगामी काळात अधिक व्यापक व प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नेतृत्वाची ओळख: संजय मधुकर महाकाळकर

• गटाचे नाव : नागपूर महाविकास आघाडी

• राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

• गटनेते : संजय मधुकर महाकाळकर

राजकीय अनुभव :

• चार वेळा नगरसेवक :

• २००२–२००७

• २०१२–२०१७

• २०१७–२०२२

• २०२६–२०३१

• २०१७ नागपूर महानगरपालिकेचे पहिले विरोधी पक्षनेते

• २०२६ मध्ये प्रभाग क्र. ३० (ब) मधून निर्वाचित

• जन्मतारीख : १७ जानेवारी १९७४

Popular Articles