spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘जय हो’गीतावरील नृत्याने मनपाच्या विद्यार्थिनींनी जिंकली मने

– ७७ व्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनात सहभाग

नागपूर :- ७७ व्या प्रजासत्ताकाच्या दिनानिमित्त कस्तुरचंद पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध पथसंचलन आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या ‘जय हो’ सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशप्रेमाचा आविष्कार घडविला.

यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मा.खासदार श्यामकुमार बर्वे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यास चे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर, अतिरिक्त आयुक्त वसूमना पंत, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी , पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या नेतृत्वात व शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्या देखरेखीत प्रजासत्ताक दिनी मनपाच्या पी.एम. श्री संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या 110 विद्यार्थीनीनी ‘जय हो’ या देशभक्तीपर गीतावर उत्कृष्ट रोमहर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच पी.एम. श्री संजयनगर माध्यमिक शाळा आणि मनपाच्या विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी पांढऱ्या शुभ्र गणवेशात सादर केलेल्या शिस्तबद्ध पथसंचलनाला पाहुण्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचालनात सहभाग घेतलेल्या विद्यार्थिनींनीचे कौतुक करीत अभिनंदन केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी  साधना सयाम, उपशिक्षणाधिकारी संजय दिघोरे, सीमा खोब्रागडे, शाळा निरीक्षक प्रशांत टेंभुर्णे उपस्थित होते. या यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता दांडेकर, शिक्षिका रेणू तुलसानी, सुनीता ईश्वरकर आणि कोरिओग्राफर टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.

Popular Articles