spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिन साजरा

चंद्रपूर :- चंद्र्पुर शहर महानगरपालिकेच्या वतीने ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:५० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयुक्त श्री.अकुनुरी नरेश,भा.प्र.से. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सकाळी ७.४० वाजता महानगरपालिका कार्यालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केल्यावर सकाळी ७.५० वाजता महानगरपालिका कार्यालयाच्या इमारतीवर आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या हस्ते राष्ट्रध्वजास ध्वजारोहण व मानवंदना देण्यात आली. यावेळी आयुक्त यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत केले. चंद्रपूर महानगरपालिकेचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरु असुन गतिमान प्रशासनासाठी नियोजनबद्ध कार्य करण्याच्या सुचना दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे. नगरसचिव नरेंद्र बोबाटे,डॉ. नयना उत्तरवार, डॉ.अमोल शेळके, सचिन माकोडे,राहुल पंचबुद्धे,अनिल घुमडे,विजय बोरीकर यांच्यासह नवनियुक्त नगरसेवक,सर्व विभाग प्रमुख,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स चंद्रपूर, प्रभाग कार्यालय क्रमांक – २ कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक,प्रभाग कार्यालय क्रमांक – ३ , बंगाली कॅम्प येथे सहायक आयुक्तांच्या हस्ते तसेच जटपुरा गेट समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आयुक्त यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. सकाळी ८.२५ वाजता हुतात्मा स्मारक वाचनालय सिविल लाइन्स येथे अतिरिक्त आयुक्त श्री.चंदन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला.

Popular Articles