spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

केळापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेश बेतवार

पांढरकवडा :- पत्रकार वेलफेअर असोसिएशन पांढरकवडा (रजि. क्र. एफ २०९३१) द्वारा संचालित केळापूर तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. संघाच्या अध्यक्षपदाची धुरा अनुभवी पत्रकार राजेश बेतवार यांच्याकडे सोपवण्यात आली असून, सचिवपदी ओमेश दर्शनवार यांची निवड करण्यात आली आहे.

२५ जानेवारी रोजी पांढरकवडा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार संघटनेची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर सर्वानुमते नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

अध्यक्षपदी राजेश बेतवार यांची निवड झाली असून, उपाध्यक्ष म्हणून संजय औदार्य, सचिव म्हणून ओमेश दर्शनवार तर कोषाध्यक्ष म्हणून सुधीर कोचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवड प्रक्रियेप्रसंगी पत्रकार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक तावरे, योगेश पडोळे, रवी दर्शनवार, रफिक खान, अरुण गोडे, राहुल वराडे यांच्यासह परिसरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पत्रकार वर्तुळात तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. पत्रकारांचे संघटन मजबूत करणे आणि सामाजिक समस्यांना न्याय मिळवून देणे, हाच संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे नूतन अध्यक्षांनी यावेळी सांगितले.

Popular Articles