spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बल्लारपुरात काँग्रेस विजयाचा निर्धार; अभिजित वंजारी यांनी भरला पदाधिकाऱ्यांत जोश

– कबीर लॉन येथे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आढावा बैठक

बल्लारपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांना विजयी करण्यासाठी बल्लारपुरातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला. निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने कबीर लॉन येथे आयोजित आढावा बैठकीत ॲड. वंजारी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत विजयासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.

चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर आणि ॲड. अभिजित वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निवडणूक प्रचाराचा आढावा घेत पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन आणि संघटनात्मक पातळीवर करावयाच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध आघाड्यांनी समन्वयाने काम करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. पदवीधर मतदारांशी संपर्क वाढवून पक्षाची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. बैठकीमुळे उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या बैठकीला माजी आमदार जैनुद्दिन जव्हेरी, सिनेट सदस्य दीपक धोपटे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन भगत, बल्लारपूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंदाजी उपरे, शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्या, भास्कर माकोडे, नगरसेवक इस्माईल ढाकवाला, ॲड. मेघा भाले, आर. आर. यादव, नरेश मुंदडा यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार उपस्थित होते.

Popular Articles