spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रविवार ११ ऑक्टोबर रोजी मनपाची सायकल रॅली

– सेवा संकल्प अभियानांतर्गत भव्य आयोजन

नागपूर :- केंद्र व राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता सिव्हील लाईन्स स्थित मनपा मुख्यालय येथून करण्यात आले आहे. नागपुरातील सायकलपटू व सर्व सायकल प्रेमी चमू मोठ्या उत्साहात सहभागी होणार आहेत.

विशेष म्हणजे, सायकल रॅली मनपा मुख्यालय, सिव्हिल लाईन्स येथून आकाशवाणी चौक, जी.पी.ओ. चौक, सी.पी. क्लब, हनुमान मंदिर, तेलंखेडी आणि व्ही.सी.ए. चौक या मार्गाने प्रवास करत मनपा मुख्यालयासमोरील हिरवळीवर रॅलीचा समारोप होणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करणे, हा या सायकल रॅलीच्या आयोजनामागील उद्देश आहे. या सायकल रॅलीच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर शहरातील नागरिक, सायकलप्रेमी, युवक-युवती आणि विविध संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात येत आहे.

Popular Articles