spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत सपत्नीक आगमन

– मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले स्वागत

–  आज शपथविधी   

मुंबई :- महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी तेलगंणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आज मुंबई येथे सपत्नीक आगमन झाले.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भरती आदींनी त्यांचे स्वागत केले.

लोकभवन येथे आगमन प्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली. मंगळवार १० मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता जिष्णु देव वर्मा राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय त्यांना शपथ देतील.

Popular Articles