नागपूर. दि. 26 :- विभागीय आयुक्त कार्यालयात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात महसूल अपर आयुक्त राजेश खवले आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त (अ.का.) तुषार मठकर यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. आयुक्तालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.




