किशोर साहू, मौदा, ता. 30 :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तोंडली गावच्या सरपंचा दर्शनाताई बागडे व उपसरपंच रामपाल धांडे उपस्थित होते. सविधान जागृतीचे व अंमलबजावणीचे घोषवाक्यांनी विद्यार्थ्यांनी व गावातील नागरिकांनी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या देशाच्या संविधानाविषयी सखोल माहिती त्यांच्या प्रास्ताविकातून दिली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून व गीत गायनातून संविधानाविषयीचा आदर व्यक्त केला. संविधानातील मूलभूत तत्वांची व नागरिकांच्या कर्तव्य व जबाबदारीची जाण ठेवणे ही काळाची गरज आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सर्वांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सोबत वाचन केले.
प्रश्नमंजुषा स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,रंगभरण स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी अंगणवाडी सेविका मंदा सेलोकर,सुरेखा भाभुळकर, धनपाल ईश्वरकर, मुरलीधर गाढवे,विदेश धांडे, रामकृष्ण तिजारे, प्रमोद बागडे, तितीरमारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग बघून पालकांनी कौतुक केले.नक्कीच एक सुजाण व जबाबदार नागरिक शाळेमध्ये घडत आहेत याचे समाधान व्यक्त केले.




