किशोर साहू, मौदा :- चाचेर, वार्ड क्र. 4 येथील जागृत श्री नागोबा (नागठाणा) मंदिरात सरपंचा लुंबिनी महेश कलारे व माजी उपसरपंच प्रकाश वाक्कलपूडी, ग्रामपंचायत सदस्यगण शैलेश कोपरकर, सुरेंद्र टेम्भरे, चंद्रकला धोटे, सुमन सोमकुवर, नलू दरवई व गावकरी प्रभाकर दरवई, वासुदेव सोमकुवर, सुरेश पाटील, राहुल झाडे, कुंभलकर, आपतूरकर गावकरी यांनी ऋषीपंचमी पूर्वी पाहणी केली असता धक्कादायक बाबी आढळल्या
सदर काम मागील 5-6महिन्यापासून पूर्णपणे बंद असून 40%-50%काम झालेले आहे उर्वरित बांधकाम, गेट, ग्रील, फरशी, पेंटिंग, फिनिशिंग ही कामे अपूर्ण आहे. कंत्राटदाराने लेबरला वेळेवर पैसे न दिल्याने त्यांनी 5-6 महिन्यांपूर्वीच काम सोडले आहे.हे मंदिर गावचे श्रद्धास्थान असून या मंदिरात चाचेर व परिसरातील भक्तगणांची दररोज रेलचेल असते. त्यामुळे या मंदिराचे प्रलंबित बांधकाम पूर्ण करण्याची मागणी सरपंच लुंबिनी महेश कलारे सह सर्व ग्रामपंचायत सदस्यगण व भक्तगण, गावकऱ्यांनी केली आहे.
याबाबत या बांधकामावर नियंत्रण ठेवणारे पंचायत समिती मौदा येथील बांधकाम विभागातील अभियंता कुश यादव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या बांधकामाचे कंत्राटदार रेवराल येथील अंकित कुटे असून, येत्या आठ दिवसात उर्वरित प्रलंबित बांधकाम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. केलेल्या बांधकामाचे कंत्राटदाराला अजूनही एकही रुपया निधी मिळाला नसून आणखी दीड वर्ष निधी मिळणार नाही. तसेच 2515 कामाचा निधी दोन – दोन वर्ष मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित कंत्राटदाराला या बांधकामाबाबत विचारपूस करण्याकरिता अभियंता यादव यांना भ्रमणध्वनी क्रमांक मागितला असता, त्यांनी कंत्राटदाराच्या भ्रमणध्वनी क्रमांक पाठवतो म्हणाले मात्र अजूनही त्यांनी पाठवलेला नाही, हे विशेष !





