Home Latest News गौरविलेल्या सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्यांची उभारणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

गौरविलेल्या सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्यांची उभारणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> राज्यातील अंगणवाड्यांना आधुनिक&comma; सशक्त आणि पारदर्शक बनवून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट अंगणवाडी योजनेअंतर्गत राज्यभरात व्यापक कार्यवाही सुरू आहे&period; या योजनेअंतर्गत उत्कृष्ट सरपंच म्हणून गौरविण्यात आलेल्या १३ सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्या उभारण्यात आल्या असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की&comma; १३ गावांतील अंगणवाड्यांना स्मार्ट स्वरूप देण्यात आले आहे&period; या केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा&comma; डिजीटल शिक्षण साधने&comma; तसेच बालक आणि मातांसाठी आरोग्य व पोषण जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आले आहेत&period; हे काम पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आहे&period; एकात्मिक बालविकास सेवा &lpar;आयसीडीएस&rpar; योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये बालकांना आरोग्य&comma; पोषण आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत मूलभूत सेवा पुरविल्या जातात&period; या अंगणवाड्यांना स्मार्ट बनविण्याच्या उपक्रमामुळे त्यांच्या पायाभूत सोयी-सुविधांमध्ये सुधारणा झाली असून&comma; शिक्षण आणि पोषण सेवा अधिक प्रभावी पद्धतीने दिल्या जात आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हणाल्या की&comma; स्मार्ट अंगणवाडी हे केवळ इमारतीचे नव्हे&comma; तर बालक आणि मातांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहे&period; आधुनिक तंत्रज्ञान आणि संवेदनशील दृष्टिकोन यांचा संगम घडवून अंगणवाड्यांना आदर्श केंद्र बनवण्याचा प्रयत्न आहे&period; या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून&comma; राज्यातील सर्व अंगणवाड्यांना टप्प्याटप्प्याने स्मार्ट स्वरूप देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचेही तटकरे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version