यासीन शेख, गोंदिया :- देशात आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर संबंधाने विविध प्रकारे अफवा पसरवून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून अशांतता निर्माण होण्याचे चित्र दूरदर्शन व व्हाट्सअप वर आल्यामुळे गॅसधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्या संबंधाने सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत आमगाव तपन गॅस एजन्सीला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती जाणून घेतली. तपन एजन्सी चे पार्टनर सुनील माहेश्वरी यांनी दिलेली माहिती की दरवर्षी खातेधारकांनी ई केवायसी करणे बंधनकारक असून सुद्धा ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे यंत्रणेमध्ये बुकिंग नंतर स्लिप रशीद निघण्यासाठी अडचण निर्माण होत असून ग्राहकांना सिलेंडर मिळण्यासाठी त्रास सहन करावा लागतो तसेच लवकर इ – केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. सिलेंडर बुकींग च्या पद्धतीमध्ये यंत्रणे कडूनच सध्या बारा तासाच्या कालावधी लागत असून ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तपन गॅस एजन्सी कोणत्याही प्रकारच्या अनियमत्तेला बडी न पडता वाढलेल्या दरामुळे सिलेंडर मिळण्यास चार-पाच दिवसाच्या विलंब होऊ शकतो. बुकिंग झाल्यावर नवीन नियमानुसार सिलेंडर मिळण्यास 25 दिवसाच्या कालावधी यंत्रणेनुसार लागत असल्यामुळे एजन्सीला ग्राहकाच्या रोषामुळे त्रास सहन करावे लागत आहे. तरी सामाजिक बांधिलकी म्हणून लग्नासाठी संबंधित व्यक्तीने लग्न पत्रिका दाखविल्यावर आमच्याकडून त्यांना सिलेंडर पुरवठा करण्यात येत आहे. तपन गॅस एजन्सी सदैव ग्राहकांच्या हितासाठी कार्य करीत असून कोणत्याही अफवांना बळी न पडता एजन्सीत चौकशी करून गैरसमज टाळता येईल. ग्राहक पंचायत चे अध्यक्ष व्हि.डी मेश्राम, संघटन मंत्री जगदीश शर्मा, सचिव एल एम खंडाईत, सदस्य संतोष पुंडकर यांनी विचारलेले प्रत्येक समस्यांचे निराकरण सुनील माहेश्वरी यांनी केले.
ग्राहक पंचायतने गॅस सिलेंडर संबंधी जाणून घेतली समस्या


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



