Home Latest News इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग ॲन्ड डेव्हलपमेंन्ट चा दीक्षांत समारंभ संपन्न

इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग ॲन्ड डेव्हलपमेंन्ट चा दीक्षांत समारंभ संपन्न

0
35

नागपूर :- भारतातील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था असलेल्या Indian Society for Training and Development (ISTD) ने गेल्या वर्षी सुरू केलेल्या ‘प्रशिक्षण, शिक्षण आणि विकास’ या पदव्युत्तर कार्यक्रमाचा दीक्षांत समारंभ नुकताच दिल्ली येथे उत्साहात संपन्न झाला. या भव्य सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनिल अब्रोल उपस्थित होते. तसेच या पदव्युत्तर कार्यक्रमाच्या शैक्षणिक परिषदेचे सदस्य आणि नागपूरचे डॉ युगल रायलू विशेष पाहुणे म्हणून याप्रसंगी उपस्थित होते. समारंभात प्रत्येक विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या तसेच संपूर्ण अभ्यासक्रमात अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात आले. याशिवाय सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण सभागृहात उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.