कन्हान :- कन्हान पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की भारत पेट्रोलपंपचे मागे विठ्ठल कनोजे याचें घराचे बाजुला कान्द्री कन्हान येथे कोंबडयाची झुंज लावून पैशांचा हारजितचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे कन्हान पोलीस घटनस्थळी पोहचले असता, भारत पेट्रोलपंपचे मागे विठ्ठल कनोजे याचे घराचे बाजुला कान्द्री, कन्हान येथे काही इसम कोंबडयांच्या पायाला धारदार काती बांधुन त्यांची झुंज लावुन पैशांचा हारजितचा खेळ खेळतांना दिसुन आले. पोलीसांना पाहुन काही इसम पळुन गेले. आरोपी क. १) नरेन्द्र केसरीप्रसाद दुबे, वय ४२ वर्ष, रा. देशपांडे लेआउट त्रिमुर्ती नगर नागपूर २) अनिकेत अशोक मेश्राम, वय २७ वर्ष, रा. नागसेननगर कामठी ३) सचिन हरीभाउ दुधपचारे, वय ३० वर्ष, रा. सर्वोश्री नगर उमरेड रोड दिघोरी नागपूर यांना पोलीसांनी शिताफिने पकडले. आरोपीच्या ताब्यातून एकुण नगदी १२३०/- रूपये व लोखंडी काती किंमती ५०/- रूपये तसेच जख्मी लाल रंगाचा कोंबडा लीलाव करण्यात आला किंमती ३००/-/- रूपये असा एकुण १५८०/- रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे. नमुद आरोपी यांच्यावर पोलीस स्टेशन कन्हानला १२ (ब) म. जु. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोंबडयांची झुंज लावुन जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा नोंद


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



