spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सराईत गुन्हेगार विशाल चिचोंळकर ला स्थानबध्द केले

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत सराईत गुन्हेगार विशाल चिचोळकर यास मा. जिल्हाधिकारी नागपुर यांचे आदेशान्वये मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे स्थानबंध्द करण्यात आले.

नागपुर ग्रामिण येथील सराईत गुन्हेगार विशाल नामदेवराव चिचोळकर वय ३९ वर्षे रा. धरम नगर कन्हान ता. पारशिवनी जि. नागपुर याचे विरूध्द पोस्टे कन्हान येथे साथीदारासह प्राणघातक शस्त्राने जिवे मारण्याचा प्रयत्न करून दरोडा घालणे, गैरकादयाची मंडळी जमवुन खुनाचा प्रयन्त करणे, गंभीर दुखापत पोहचवुन शिवीगाळ करूण जिवे मारण्याची धमकी देणे, शासकीय मनाई आदेशाचे उल्लंघन करूण प्रति बंधित क्षेत्रात प्रवेश करणे, साथीदारांसह चोरी करणे तसेच अवैध गांजा जवळ बाळगुण विकी करणे अशा प्रकारेचे गुन्हे दाखल असुन त्याचा कडुन भविष्यात अशा प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याचा गुन्हेगारी कृत्याला आळा घालण्यासाठी सदर इसमा विरूध्द पोलीस स्टेशन कन्हान येथुन कलम ३ (१) एमपीडीए कायद्या अन्वये कारवाई करण्यास सदर प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी साहेब नागपुर यांनी त्यांचे आदेश कं आजिदं/गृह/कक्ष-१४ (१)/कावि- ४८/२०२६ दि.४/२/२०२६ अन्वये स्थानबध्द करणे बाबत आदेश पारित केल्याने विशाल नामदेवराव चिचोंळकर यास दि. ५/२/२०२६ मा. जिल्हाधिकारी साहेब नागपुर यांचे आदेशान्वयें मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे स्थानबंध्द करण्यात आले.

सदर कार्यवाही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक ना.ग्रा., अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक ना.ग्रा. यांचा मार्गदर्शनात संतोष गायकवाड उप. विभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कामठी, वैजयंती मंडवधरे वरिष्ठ पोनि पोस्टे कन्हान, पोहवा. हरिष सोनभद्रे, पोहवा. अमित यादव, पो.शि. आकाश सिरसाट, अश्विन गजभिये, वैजनाथ तोटेवार आदीने पार पाडली.

Popular Articles