खापा, वार्ताहर :- संत पतीराम महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ‘श्री मुरलीधर देवस्थान ट्रस्ट, खापा’ तर्फे शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी सकाळी दहा वाजता आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. ह्या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिरात सहभाग घेऊन सामाजिक जबाबदारी जपली. ‘संकल्प नवा, ध्यास नवा, प्रत्येक घरी एक तरी रक्तदाता हवा’, हा संदेश देत रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे सर्वात मोठे दान मानले जाते आणि अशा शिबिरांमुळे समाजात एकता व मानवतेच्या संदेश पोहोचतो. अशा प्रकारची शिबिरे थॅलेसेमिया, कर्करोग किंवा अपघातग्रस्तांसाठी अत्यंत उपक्रम उपयुक्त ठरतात. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर येथे विशेषतः स्त्रियांसाठी रक्ताची गरज असते. त्याचप्रमाणे रक्तपेढी मार्फत दोन वर्षाच्या अवधीत रक्तदात्याला आवश्यकतेनुसार मोफत रक्त दिले जाते.
शहराचे प्रथम नागरिक पियुष बुरडे यांच्या हस्ते पूजा करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय द्वारा संचालित मेट्रो ब्लड बँकेच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले. डॉ. पूनम निमगडे, पुंडलिक लोहारे, वंदना झाडे, स्वप्निल चौधरी, वासुदेव निकोसे, राजेश गिल या चमूने रक्तसंकलन केले. यावेळी नगराध्यक्ष पियूष बुरडे, मकसूद शेख, मुकेश पावडे, आशिष सिंग राठोड, अंकित मुंगोले, अक्षय हिंगे, सोनू बारापात्रे, मनोज चकोले, विकास चकोले, सचिन भैसारे, सचिन तुमाने, चेतन मोरे, अमोल लाड, जितेंद्र वैद्य, मंगेश काळे, कुणाल मदनकर, आदींनी रक्तदान केले. यांच्यासह शेकडो भक्त, महिला, शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मंदिराच्या विश्वस्तांनी शिबिराची सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे केली.








