spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान बुद्ध विहार येथे दलाई लामा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

कन्हान ०९ : बौद्ध धम्म गुरू दलाई लामा यांचा 90 वा वाढदिवसा निमित्त के.सी.एस.लामा चॅरिटेबल ट्रस्टनेच्या वतीने कन्हान बुध्द विहार सिध्दार्थ कॉलनी गणेश नगर कन्हान येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भदंत आर्य के.सी.एस.लामा यांनी कार्यक्रमात उपस्थित बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्म गुरू दलाई लामा यांच्या जीवनीवर प्रकाश टाकत मार्गदर्शन करीत सांगितले की  प्रेम, करुणा, संयम आणि नैतिक शिस्तीचे प्रतीक आहेत. तसेच दलाई लामा यांचे जन्म 6 जुलै 1935 रोजी तिबेटमधील तक्सर गावात (अम्दो प्रदेश) झाला. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी त्यांनी बौद्ध तत्वज्ञान, तंत्र, संस्कृत, तर्कशास्त्र आणि इतर धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला.त्यांचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक घर मानतात आणि जगभरात शांती, करुणा, सहिष्णुता आणि वैश्विक मानवतेचा संदेश पसरवत आहेत. दलाई लामा यांना जगभरात शांती, अहिंसा आणि धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. आणि धम्म देशान मध्ये, त्यांनी आठ बोधिसत्व आणि तिबेटच्या तेराव्या दलाई लामांचाही उल्लेख केला. असेच चौदाव्या धम्म गुरु दलाई लामा आहेत. भारत आणि तिबेटमधील संबंध गुरु आणि शिष्यासारखे आहेत. भगवान बुद्धांच्या मार्गाने आपणही बोधिसत्व बनू शकतो असे उपस्थित बौद्ध अनुयायांना मार्गदर्शन करीत जीवनीवर प्रकाश टाकला.
या प्रसंगी भव्य केक कापून बौद्ध धम्म गुरू दलाई लामा यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी  गौतम खंडारे, विदेश भोवते,गौतम नितनवरे पुंडलिक मानवटकर, संदीप शेंडे,चंद्रशेखर डोंगरे, राजेश फुलझेले,केतन भिवगडे़, राजेश फुलझेले, सुजाता मेश्राम,पिंकी मेश्राम,जिजाबाई मानवटकर,गीता सतदेवे,नमिता फुलझेले, सिंधू वाघमारे,अर्चना फुलझेले, बबीता मानवटकर,अनिता दुपारे,दुर्गा गजभिये,अर्चना चव्हाण, शिला बागडे, रजनी कुंभारे, दुर्गा निकोसे, सुजाता नारनवरे सह बौद्ध अनुयायी उपस्थित होते.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.