भंडारा, ०९ : शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी! किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 मधील धान व भरडधान्य खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 30 जून 2025 ही अंतिम मुदत होती, मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची खरेदी प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यामुळे, शासनाने 7 जुलै 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार खरेदीची अंतिम मुदत आता 20 जुलै 2025 पर्यंत वाढवली आहे.
प्रथम नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या धान किंवा भरडधान्याची विक्री जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन लवकरात लवकर पूर्ण करावी आणि किमान आधारभूत किंमतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. जिल्हा पणन अधिकारी एस. बी. चंद्रे यांनी केले आहे.
@filephoto




