किशोर साहू, मौदा ,ता.२०:- तालुका शिवसेना कार्यालय मौदा येथे स्व. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी त्यांच्या फोटोला पूजाअर्चना, माल्यार्पण व त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकून करण्यात आली.
याप्रसंगी तालुका शिवसेनाप्रमुख नितेश वांगे, पदाधिकारी सदूकर हटवार, खात रेवराल जिल्हा परिषद सर्कल प्रमुख श्रीहरी थोटे, खात पंचायत समिती सर्कल प्रमुख लोकेश राकडे सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




