spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयांची तीन वर्षांनंतरही अंमलबजावणी नाही; २६ मे च्या परिपत्रकाविरोधात कोळी महादेव समाजाचे निवेदन

अमरावती :- कोळी महादेव जमातीच्या प्रलंबित मागण्या तसेच आदिवासी विकास विभागाने दि. २६ मे २०२६ रोजी जारी केलेले परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने आज अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना दोन स्वतंत्र निवेदने सादर करण्यात आली.

समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही त्या निर्णयांची अंमलबजावणी झालेली नसल्याने समाजात नाराजीचे वातावरण आहे.

आदिवासी विकास विभागाच्या २६ मे २०२६ च्या परिपत्रकामुळे वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेत विद्यार्थ्यांना, युवकांना व नागरिकांना अडचणी निर्माण होणार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित परिपत्रक तात्काळ मागे घेऊन समाजहिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

कोळी महादेव समाजाच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा राज्यव्यापी लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री व संबंधित विभागांकडे समाजाच्या मागण्या जिल्हाधिकारी अमरावती यांचे प्रतीनिधी अधीक्षक खटके यांचे मार्फत पोहोचविण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने कोळी महादेव अनुसूचित जमाती चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles