spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बोरी (घिवारी) येथे शेतात आढळलेल्या हरणीच्या बछड्याला सुरक्षित जीवदान; वन विभागाच्या ताब्यात सुपूर्द

किशोर साहू, मौदा :- गट ग्रामपंचायत बोरी(घिवारी) हद्दीतील शेतात शुक्रवार (ता.10 जुलै) रोजी काम सुरू असताना एका हरणीचा अतिशय लहान बछडा सायंकाळ दरम्यान आढळून आला. ही माहिती तात्काळ ग्रामपंचायतीचे सरपंच विशाल सेलोकर यांना देण्यात आली.

माहिती मिळताच सरपंच विशाल सेलोकर यांनी तत्काळ रामटेक वन विभागाशी संपर्क साधून घटनास्थळी वन विभागाचे वाहन बोलावले. बछडा अत्यंत लहान असल्याने त्याला कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, याची विशेष काळजी घेत सुरक्षितपणे वन विभागाचे फॉरेस्ट गार्ड अभिजीत बगलेवर यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.

या बचावकार्यात सरपंच मित्र परिवार प्रविण भुते, अजय तिजारे,विजेश मडावी ,अभिजित झंझाळ, विक्की गोंधुळे ,नितेश ढेंगे यांनी मोलाचे सहकार्य केले. मुक्या प्राण्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असून, वन्यजीव आढळल्यास त्यांना हाताळण्याचा प्रयत्न न करता त्वरित वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका निरागस वन्यजीवाचा जीव वाचला असून या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

Popular Articles