Home Latest News तुमसर व भंडारा रोड जंक्शनवर महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी

तुमसर व भंडारा रोड जंक्शनवर महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी

0

<p><strong>&&num;8211&semi; प्रवासी व व्यापारी वर्गाची गैरसोय दूर करा&semi; पालकमंत्री डॉ&period; पंकज भोयर यांच्यामार्फत रेल्वे प्रशासनाला निवेदन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>हंसराज&comma;भंडारा तुमसर &colon;-<&sol;strong> तुमसर रोड आणि भंडारा रोड जंक्शन येथे प्रवासी&comma; नोकरदार&comma; व्यापारी तसेच  विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता&comma; या दोन्ही प्रमुख स्थानकांवर लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा देण्यात यावा&comma; अशी जोरदार मागणी जोर धरत आहे&period; या संदर्भात देव्हाडी-परसवाडा येथील सतीश शेंडे&comma; जयचंद पारधी व प्रवाशांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ&period; पंकज भोयर यांच्यामार्फत केंद्रीय रेल्वे प्रशासन व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सादर निवेदनात नमूद केल्यानुसार&comma; मुंबई–हावडा मार्गावरील प्रसिद्ध &OpenCurlyQuote;गीतांजली एक्सप्रेस’&comma; &OpenCurlyQuote;उधना ब्रह्मपूर एक्सप्रेस’ आणि &OpenCurlyQuote;अमृतसर भारत एक्सप्रेस’ या गाड्यांना तुमसर रोड व भंडारा रोड रेल्वे स्थानकांवर तातडीने थांबा देण्यात यावा&period; नागपूर–भंडारा–गोंदिया मार्गावर नियमित प्रवास करणारे दुग्ध व्यावसायिक&comma; विद्यार्थी&comma; कामगार व नोकरदार वर्गासाठी रात्री २&colon;३० ते पहाटे ३&colon;३० या कालावधीत कोणतीही पर्यायी रेल्वे उपलब्ध नाही&period; यामुळे प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडत असून या वेळेत थांबा दिल्यास सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>तुमसर रोड जंक्शनवरून तिरोडी&comma; बालाघाट व जबलपूरकडे रेल्वे मार्ग विस्तारलेला असून येथून रेल्वेला दररोज लाखो रुपयांचा महसूल मिळतो&period; आशिया खंडातील सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ म्हणून तुमसरची ओळख आहे&period; याशिवाय परिसरातील चिखला व डोंगरी बु&period; येथील मॅग्नीज खाणी&comma; वरठी येथील सनफ्लॅग पोलाद प्रकल्प&comma; जवाहरनगरची ऑर्डनन्स फॅक्टरी&comma; गोसेखुर्द प्रकल्प तसेच चांदपूर देवस्थान व आंबागड किल्ला या पर्यटन स्थळांमुळे या दोन्ही स्थानकांना मोठे औद्योगिक व व्यापारी महत्त्व आहे&period; केंद्र सरकारच्या &OpenCurlyQuote;अमृत भारत स्टेशन योजने’त या दोन्ही स्थानकांचा समावेश असूनही प्रमुख गाड्यांना थांबा नसल्याने संताप व्यक्त होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या मागण्यांची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तात्काळ थांबा मंजूर करावा&comma; अशी मागणी करण्यात आली आहे&period; सदर निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी&comma; खासदार प्रफुल्ल पटेल&comma; जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ&period; पंकज भोयर&comma; माजी पालकमंत्री डॉ&period; परिणय फुके&comma; तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक &lpar;DRM&comma; मध्य रेल्वे नागपूर&rpar; यांना पाठविण्यात आल्या आहेत&period; हे निवेदन सादर करताना भाजप जिल्हाध्यक्ष आशुतोष गोंडाने&comma; सचिन कुंभलकर &comma; मदनकर&comma; सतीश शेंडे&comma; जयचंद पारधी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version