यवतमाळ :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रविवारी दि. 26 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे आगमन होणार असून, त्यांच्या उपस्थितीत विकासकामांची आढावा बैठक होईल.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : रविवारी, दु. 3.30 वाजता पोलीस कवायत मैदान, हेलिपॅड, यवतमाळ येथे आगमन. दुपारी 3.35 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढाव्यासंबंधी बैठक, सायंकाळी 4.15 वाजता द व्हेनेशियन हॉटेलकडे प्रयाण व तिथे आयोजित शिवसेवा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 7.00 वाजता मोटारीने नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.




