Related Posts

विकसित भारत युवा संसद उत्साहात संपन्न

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> माय भारत&comma; यवतमाळ यांच्या वतीने वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय&comma; यवतमाळ येथे ३१ ऑक्टोबर रोजी &OpenCurlyQuote;विकसित भारत युवा संसद’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period; या कार्यक्रमात २० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला&period; सदर कार्यक्रमात एक देश&comma; एक निवडणूक विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी विचारमंथन केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ&period; अंजली गहेरवार होत्या&period; तर पांढरकवडा येथील सहाय्यक वनसंरक्षक उदय आवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते&period; तसेच पूनम अहिरे यांचीही उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;<p>या युवा संसद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी &OpenCurlyQuote;एक देश&comma; एक निवडणूक’ या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय विषयावर आपले विचार प्रभावीपणे मांडले&period; एकत्रित निवडणुकांचे फायदे&comma; आव्हाने&comma; लोकशाही प्रक्रिया आणि देशाच्या विकासातील त्यांचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारमंथन केले&period; या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संसदीय कार्यपद्धतीची माहिती मिळण्यासोबतच लोकशाही मूल्यांची जाणीव&comma; वक्तृत्व कौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>स्पर्धेत अमृता रोडे हिने प्रथम क्रमांक पटकावला&period; गौरव बडोले याने द्वितीय&comma; तर आयुष्मान जैन याने तृतीय क्रमांक मिळविला&period; हिमानी बिरकड हिला रनर अप म्हणून घोषित करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हा युवा अधिकारी सुरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period; कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रवी शेळके आणि मनीष आडे यांनी विशेष परिश्रम घेतले&period; तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी&comma; प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले&period;<&sol;p>&NewLine;