spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ढुमणे दाम्पत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षात प्रवेश

बेला :- येथील अंबिका लोकसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख, उदयोन्मुख व्यावसायिक व प्रतिष्ठित, सामाजिक कार्यकर्ते दामोधर मनोहर ढुमणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पत्नीसह प्रवेश घेतला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख व नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सलील देशमुख यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी पक्षात प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले. गणेशपेठ येथील कार्यालयात सलील देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. याप्रसंगी, निरीक्षक अंजली साळवे, माजी आमदार विजय घोडमारे, प्रवक्ते प्रवीण कुंटे, कार्याध्यक्ष योगेश धनुष्कर, चंद्रशेखर कोल्हे,वैशाली टालाटुले, उमरेड विधानसभा प्रमुख सुधीर मोहोड, उत्तम पराते, गुणवंत खोडके व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश घेतल्याबद्दल प्रज्योत देशमुख, संजय मंदे, राष्ट्रवादीचे रमेश परसराम भोयर,तुकाराम फलके, अनिता दरणे (उदासा), युवकचे जिल्हाध्यक्ष दिनेश साळवे (कुही), उत्तम पराते, दिनेश गोळघाटे, जनार्दन सुरकार (जसापुर), पूुंडलिक कामडी, अमित नवनागे,खुशाल वैद्य (सिरसी), संदीप धंदरे पिपरा,रवी भोकरे, धनलक्ष्मी कृषी केंद्राचे संचालक खोडे, सुभाष तळवेकर, सौरभ सोनकुसरे, प्रफुल निंबाळकर, नामदेवराव लामपुसे, प्रेम भुसारी व असंख्य कार्यकर्त्यांनी डुमणे दांपत्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Popular Articles