spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आलागोंदी येथे सत्संग उत्साहात

बेला :- नजीकच्या आलागोंदी येथे ओम परमात्मा सेवक मंडळाचा सत्संग उत्साहात पार पडला. यावेळी पूजनीय गुरु भोजराज निनावे यांनी उपस्थित राहून सेवकांना आनंदी जीवनाबाबत मौलिक मार्गदर्शन केले. सत्संग सोहळ्यास गुरु आई प्रामुख्याने उपस्थित होत्या. पांडुरंग उपरे व कुटुंबीयांच्या पुढाकारातून दरवर्षी ओम परमात्मा सेवक मंडळाचा वार्षिक सत्संग सोहळा घेण्यात येतो. त्यास गावातील असंख्य सेवकांची प्रामुख्याने उपस्थिती असते. त्यानुसार यंदाही सत्संग सोहळा मंगलमय वातावरणात, थाटात पार पडला.सोहळ्यास कुंदा, मंगेश, रसिका,जयदीप,आकांक्षा उपरे,हेमलता व ओवी ताजने, रोशन, प्रवीण घोडमारे, सुधाकर व रेखा उपरे, गंगाधर जरीले गजानन व सोनू रोगे, रमेश व इंदू वाघाडे व असंख्य सेवक मंडळी उपस्थित होते.

Popular Articles