spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिघोरी पोलिसांची जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई; १.७७ लाखांच्या मुद्देमालासह पाच जणांना अटक

हंसराज, प्रतिनिधी भंडारा दिघोरी :- दिघोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहेगाव जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस शिपाई आवले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी मावेश रामकृष्ण बोरकर (४८, रा. लाखांदूर), आकाश नरेंद्र टेंभुर्ण (२५, रा. लाखांदूर), गोविंदसिंग हरनामसिंग रामगडे (५८, रा. झिरोबा), बलरामसिंग करतानसिंग बावरी (४२, रा. झिरोबा) आणि गडचिरोली जिल्ह्यातील कमलेश अबालाल बन्सोड (३८, रा. सावगी) या पाच जणांना रंगेहात जुगार खेळताना पकडले. पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून ७,४३० रुपये आणि जुगाराच्या फडावरून ४,६२० रुपये अशी एकूण १२,०५० रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

या कारवाईत रोख रकमेसह ५२ ताशपत्ते, ताडपत्री आणि घटनास्थळावर असलेल्या चार दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. जप्त केलेल्या दुचाकींमध्ये हिरो सुपर स्प्लेंडर (MH 36 W 7284), हिरो आयस्मार्ट (MH 40 AD 7848), टीव्हीएस स्पोर्ट (MH 36 C 7998) आणि हिरो स्प्लेंडर प्लस (MH 35 X 2688) यांचा समावेश असून, संपूर्ण कारवाईत एकूण १,७७,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मातेरे, पोलीस शिपाई आवले व दिघोरी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन दिघोरीचे अधिकारी करीत आहेत.

Popular Articles